Home नागपूर अनेक समस्यांमुळे प्रभाग 29 चे नागरिक त्रस्त

अनेक समस्यांमुळे प्रभाग 29 चे नागरिक त्रस्त

0
अनेक समस्यांमुळे प्रभाग 29 चे नागरिक त्रस्त

प्रभाग 29 मध्ये खराब रस्ते, स्वच्छतेचा अभाव, कुत्र्यांचा हैदोस आणि येथील गार्डन मध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. यामुळे प्रभागवासी त्रस्त झालेले आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन हनुमाननगर झोन 3चे सहायक आयुक्त सुषमा मानगे यांना आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उप शहर प्रमुख दीपक अशोकराव पोहनेकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनानुसार हनुमाननगर झोन 3 अंतर्गत प्रभाग 29 मध्ये रस्ते खराब असल्यामुळे प्रभागवासियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. सफाई कामगार नियमित येत नाहीत. ज्या भागात येतात तेथे झाडून एका बाजूला कचरा लावून निघून जातात. लोकांनी कचरा उचलण्याचे सांगताच भांडण करतात. हवेमुळे कचरा इकडे तिकडे पसरत आहे. देखरेख नसल्यामुळे या प्रभागातील उद्यान ओसाड होत चालले आहे. येथे सोयीसुविधांना खूपच अभाव आहे. त्यामुळे लोकांना उद्यानात जावेसे वाटत नाही.
या प्रभाग मध्ये लावारिस कुत्र्यांचा फार हैदोस आहे. साइकिलने ये जा करणाया लहान मुलांमागे कुत्रे धावतात, चावतात. येथील कुत्र्यांचा त्रास वृद्धांनाही होत आहे. असे असतानाही येथे कुत्रे पकडणारी गाडी येत नाही. या सर्व समस्यांकडे सहायक आयुक्तांनी लक्ष देऊन प्रभागवासियांना या समस्यांपासून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.