’नागपुर विद्यापिठाचा भोंगळ कारभार

https://www.vidarbhawatan.com/news/6386 सविस्तर बातमीसाठी👆 लिंक क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल नागपुर-प्रतिनिधी : आज नागपुर जिल्हा N.S.U.I. अध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वात व नागपुर जिल्हा N.S.U.I. तर्फे रा. तू. म. नागपुर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयए सावनेर येथील प्राचार्य वीरेंद्र जुमड़े यांच्या वर महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी आर्थिक घोटाला, विनयभंग,  Ph. D.  मधे वाग्मयचौर्य,  कोरोनाच्या काळात महाविद्यालयात दारू . मटन पार्टी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान असे मागील काही वर्षा पासून गंभीर गुन्हे व तक्रारी वर विद्यापीठाने चौकशी न करता थातुर मातुर कारणे सांगून कुठलीही कार्यवाही न करता काढता पाय घेतल्या मुळे आज शेकडो कार्यकर्त्यांसोबत मा. कुलगुरुंचा घेराव करुन कार्यवाही करण्यास भाग पाडले तसेच महाविद्यालयावर प्रशासक नेमन्यास व प्राचार्य जुमड़े यांची Ph, D. चे मूल्यांकन रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे मा. कुलगुरुनी आदेश दिले आहेत.

तसेच कोरोनाच्या काळात विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी व LAW अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याकरिता तीव्र आंदोलन करण्यात आले त्यावर येत्या 15 दिवसात सक्तिची कारवाई करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना मा. कुलगुरुनी निर्देश दिले या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अजित सिंह, राष्ट्रीय प्रतिनिधी आमिर नूरी, प्रतीक कोल्हे, नागेश गिर्हे, शुभम पांडे, प्रणय ठाकुर, शादफ सोफी, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी (अध्यक्ष .पूर्व नागपुर) , निखिल वानखेड़े, शुभम वानखेड़े, फरमान अली, राज गौतम, विद्यासागर त्रिपाठी, शशांक अंजिकर, गौरव भुजाडे, उत्कर्ष वानखेड़े, सदन राखडे, नावेद पठान, सलिल वासे, तनवीर अरक्षण, लव ढोके, इरफान अहमद, राशिद अंसारी, सहित शेकड़ो कार्यकर्ते उपस्थित होते.