हमी भावापेक्षा कमी दराने शेतक-यांची पिके खरेदी करणा-यांवर खटले भरा

ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत बैठकीत सबनीस यांचे आवाहन

155

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : महाराष्ट्र शेतकºयांना उत्पादन मूल्य आणि ग्राहकांना वाजवी दर मिळण्यासाठी सरकारने मूल्य निर्धारण धोरण जाहीर करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्टÑीय संघटनमंत्री दिनकर सबनीस यांनी आज येथे कोरोना नंतर प्रथमच अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत बैठकीला प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलताना रामदास पेठ नागपुर येथील कार्यालयात केली.
ते म्हणाले, सध्याचे सुरू असलेले आंदोलन हा राजकीय भाग आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला ग्राहक हित सर्वतोपरी आहे. त्याला वाजवी किंमत मिळावी दरम्यान खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील मोठे अंतर कमी व्हावे, शेतकºयांना त्याच्या लागवड मूल्याचा प्रमाणात दर मिळावा. त्यासाठी शासनाचे मूल्य निर्धारण धोरण निश्चित करायला हवे. शेतकरीही ग्राहक आहेत. त्यांचे हित अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला हवेच आहे. बिचोलियांचे दर कमी करावे. प्राफीट आॅफ मार्जीन निश्चित व्हावे.
कोरोना संकटाबातचे सर्व शासकीय संकेतांचे काटेकोर पालन करीत केवळ विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तीन प्रमुख पदाधिकायांना प्रांत बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते.
दीप प्रज्वलित केल्यानंतर प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी प्रास्ताविक केले. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील अहवाल वाचनानंतर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी यांनी संघटनेसमोर येणाºया आव्हानांची कल्पना दिली. अ‍ॅड. गौरी चांद्रायण यांनी महिला संघटनांच्या सक्षमीकरणावा भर देण्याची गरज व्यक्त केली. स्मीता देशपांडे यांनी ग्राहक कायद्याची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रांत सचिव संजय धर्माधिेकारी यांनी केले.
बैठकीस प्रांत उपाध्यक्ष अजय गाडे, प्रांत उपाध्यक्ष डा.नारायण मेहेरे, दत्तात्रय कठाळे, गणेश शिरोळे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, तृप्ती आकांत, संध्या पुनियानी, डा. अजय गाडे, अनिरुद्ध गुप्ते, किशोर मुटे आदि उपस्थित होते.