क्रिकेट स्पर्धेचे पुरस्कार वितरित

स्व. सुनील शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित

139

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : सावरगाव येथे स्व सुनील शिंदे यांच्या स्मृती प्रियर्थ भव्य क्रिकेट स्पधेर्चे आयोजन टायगर क्रिकेट क्लब सावरगाव यांनी केले. या क्रिकेट स्पर्धेत 26 टीम ने भाग घेतला. क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन 19 डिसेंबरला सतीषभाऊ शिंदे माजी कृषी सभापती जि.प. नागपूर, वैभव दळवी उपसभापती पंस नरखेड, देवकाताई बोडखे, जिप सदस्य यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर 10 दिवस चाललेल्या या स्पर्धेत गावातील सर्व टीम तसेच बाहेर गावातील टीम ने सहभाग घेउन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने खेळले. या स्पर्द्धेचा अंतिम सामना हा टायगर क्रिकेट क्लब सावरगाव व सेंट्रल रेलवे काटोल यांच्यात झाला. या सामन्यात टायगर क्रिकेट क्लब सावरगाव ने सेंट्रल रेलवे काटोल या टीमचा पराभव करून पहिले बक्षीस मिळविले. प्रथम बक्षीस वैभव दळवी उपसभापती पंस नरखेड व द्वितीय बक्षीस पुरुषोत्तम बोडखे व मैन आफ दी सिरीज नंदुभाउऊ मोवाडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अभिजीत गोडबोले,अनिकेत सावंत,संदेश भांडवलकर,प्रफुल दारोकर, सागर सावंत, आकाश बोरडे, गौरव गावंडे, नीलेश मेटांगळें,अभिषेक सावंत, नयन पांडे, आयुष निंबाळकर, मयूर राउत, गौरव खंते, सार्थक बालपांडे इत्यादी उपस्थित होते.