मनसेच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उट्घाटन

237

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने उत्तर नागपुरातील नारी रोड मानस मंदिर चौकात जी.टी.बी.नगर प्लॉट नंबर 147 वरील मनसेचे सरचिटणीस महेश माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत गडकरी यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष अजय ढोके, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, विभाग उपाध्यक्ष लाला ससाने, विभाग कार्यालय सहाय्यक राम हेडाऊ, प्रभाग अध्यक्ष शुभम लोखंडे, संदीप चौरे, कांतेश्वर नगरारे, चेतन देशमुख, पवन कोलते, गौरव साखरे यावेळी उपस्थित होते.