Home नागपूर आकाश मडावी यांची आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ युवा अध्यक्षपदी निवड

आकाश मडावी यांची आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ युवा अध्यक्षपदी निवड

113 views
0

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : सामाजिक युवा कार्यकर्ते आकाश मडावी यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ युवाशाखे च्या अध्यक्षपदी 23 डिसेंबर 2020 रोजी, वर्धा येथे केंद्रीय कार्यकारणी च्या संपन्न झालेल्या बैठकीत एक मताने निवड करण्यात आली. 24 डिसेंबर 2020 रोजी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आर.यु.केराम व विदर्भ अध्यक्ष ?ड.मनिराम मडावी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. आकाश मडावी हे धडाडिचे युवानेते असुन त्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्या करिता संघर्ष केला असल्यामुळेच त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले. आकाश मडावी यांची विदर्भ युवा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभवदादा पिचड, महाराष्ट्र महासचिव आर.यु.केराम, कोष्याध्यक्ष जयप्रकाशजी उईके, विदर्भ अध्यक्ष ?ड मनिरामजी मडावी, कार्याध्यक्ष नामदेवजी मसराम, संपर्क प्रमुख सचिनजी पलकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष विवेकजी नागभिरे, नागपुरचे श्याम कार्लेकर, निलेश धुर्वे, स्वप्निल वलके, सागर इवनाते, प्रशांत वरठी, दुर्गेश मसराम, राहुल सावरकर, देवमरसकोल्हे, अर्चना कंगाले, दीप्ति सय्याम, स्वाती मडावी, सोनु कंगाले, मीनल दडांजे, तारा ऊईके, शालिनी युवनातें,लता कंगाले, सरोज गेडाम, अनिता दडांजे, सचिन चौधरी, पराग धुर्वे, नितेश धुर्वे, नितिन धुर्वे, आकाश सलाम, विकास कोडापे, अविनाश कोडापे यांनी अभनिंदन केले.