केंद्रीय स्वयंपाकगृहाचा करार रद्द

-स्वयंपाकी-मदतनीस यांना मिळणार रोजगार

194

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या आम सभेमध्ये विषय क्र. 4 ठराव क्र. 2 नुसार केंद्रीय स्वयंपाकगृहाचा करार रद्द करण्यात आला आहे.
शहरी भागातील 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम केंद्रीय स्वयंपाकगृहाकडे हस्तातरित करण्यात आल्याने स्वयंपाकी-मदतनीस यांचा उरदनिर्वाहाचा प्रश्न उदभवल्यामुळे केंद्रीय स्वयंपाकगृहाचे करार रद्द करून पूर्वीप्रमाणे शळांना आहार शिजविण्याचे काम सोपविण्यास समितीने सर्वानुमते मंजूरी दिली आहे.
शहरी भागातील 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम स्वयंसेवी संघटना व बचत गट यांना सोपविण्यात आले होते. सद्यस्थितीत नागपुर, वाडी, कामठी, महादुला या इिकाणी स्वयंसेवी संघटना व बचत गटाद्वारे केंद्रीय स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय स्वयंपाकगृहाद्वारे शिजवलेले आहार विद्यार्थ्यांना दररोज पुरविण्यात येते. यापूर्वी शाळांमधून आहार शिजविण्याकरिता स्वयंपाकी-मदतनीस यांची सेवा घेतल्या जात होती. त्या बदल्यात स्वयंपाकी-मदतनीस यांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येत होते. परंतु आता केंद्रीय स्वयंपाकगृहाकडे आहार शिजविण्याचे काम हस्तातरित झाल्यामुळे स्वयंपाकी-मदतनीस यांचा उरदनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला असल्यामुळे केंद्रीय स्वयंपाकगृह बंद करून पूर्वीप्रमाणे शाळांना आहार शिजविण्याचे काम सोपविण्यास समितीने सर्वानुमते मंजूरी दिली आहे. यामुळे स्वयंपाकी-मदतनीस यांना रोजगार मिळणार आहे.