आशादीप नागपूर प्रस्तुत झूमअपच्या माध्यमाद्वारे प्रकल्पाचा शुभारंभ 27 डिसेंबरला

230

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : नागपूर दिव्यभूषण यशोगाथा 2020 या प्रकल्पाद्वारे नागपूर मधील दिव्यांगांच्या यशोगाथा जनतेसमोर याव्यात. त्यांच्या संघषार्तून अनेकांना प्रेरणा घेता यावी. या हेतूने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून यावर्षी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. हे संकलन ई- माध्यमातून सर्वांना उपलब्ध होईल. आशादीप दिव्यांग प्रेरणा केन्द्रातर्फे कोविड19 च्या कालावधीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, प्रेरणा, मनोरंजन इत्याादी साठी “संवाद सेतु” उपक्रमात आजपर्यंत 25 कार्यक्रम घेण्यात आले असून हा कार्यक्रम जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित केला असून यात 15 नागपूर चे दिव्य भूषण यशोगाथा सादर करण्यात येणार आहे. दि. 27 डिसेंबर 2020 रोजी, दुपारी 4 वाजता झूमअपच्या आभासी माध्यमाद्वारे या प्रकल्पाचा शुभारंभ करताना व सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामधे हळू-हळू इतर दिव्य भूषण समाविष्ट केले जातील. याप्रसंगी सक्षम नागपुरचे प्रकल्प प्रमुख शिरीषजी दारव्हेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आपण या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा द्याव्या ही विनंती केली आहे.