शेतकºयांचा विकास नको असलेल्यांचे आंदोलन : त्रिवेदी

ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

145

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे परंपरेने मागास असलेल्या शेतकरी बांधवांना त्याच अवस्थेत पाहू इच्छिणाºयांचे हे आंदोलन असल्याचे स्पष्ट मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. ते राष्टÑीय ग्राहक दिन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्वजग आधुनिक आणि आर्थीक सुधारणांचा मार्ग अनुसरीत असताना आपण किती काळ त्याच जुन्या कल्पना आणि शोशणाच्या व्यवस्थेला चिटकून राहणार आहोत.
प्र्रारंभी प्रमुख पाहुणे जिल्हा ग्राहक आयोग सदस्य सुभाश आजने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कु. मराठे यांनी ग्राहकगीत म्हटले या प्रसंगी विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे विषेशत्वाने उपस्थित होते. विदर्भप्रांत अध्यक्षा अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक आपल्या भाषणात म्हणाले,सर्व उत्पादक आपल्या मालाची किंमत ठरवितात. शेतकरीच एक असा उत्पादक आहे ज्याच्या उत्पादनाची किंमत सरकार आणि दलाल ठरवितात.
यात शेतकºयांना बदल नकोय का.? दलालांना तो नकोय कारण शेतकºयांना मिळत नाही तेवढा पैसा दलालांना मिळतो. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अ‍ॅड.गौरी चांद्रायण यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व भाषणांचा धावता आढावा घेत नवीन कायद्यातील मध्यस्थाच्या नव्या तरतुदीवर विशेष प्रकाश टाकला. संचालन नागपूर शहर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ता यांनी केले.आभार प्रदर्शन संजय धर्माधिकारी यानी केले.पसायदानानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमात सुधांशु दाणी, काळे, उदय दीवे, दत्तात्रय कठाळे, श्रीपाद हरदास, श्रीपाद भद्धलवार, तृप्ती आकांत.अ‍ॅड विलासजी भोसकर इत्यादी उपस्थित होते.