Home नागपूर कुही पंचायत समिती येथे पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा

कुही पंचायत समिती येथे पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा

-आमदार राजू पारवे यांनी घेतला आढावा

78 views
0

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा घेण्यात आली. गुरुवार दि. 24 /12 /2020 रोज गुरूवार ला पंचायत समिती कुही येथे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा अध्यक्षतेखाली कुही तालुक्यातील ग्राम पंचायत अंतर्गत पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रत्येक ग्राम पंचायतीचे सचिव,सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी कुही तालुक्यातील ग्राम पंचायत क्षेत्रातील पाणी समस्येचा आढावा घेण्यात आला. तसेच महाआवास योजनेचाही आढावा घेण्यात आला. आमदार राजू पारवे यांनी पाणी समस्या व महाआवास योजना संदर्भात अधिकारयांना आवश्यक निर्देश दिले.