“स्वातंत्र्याचे गुलाम” गझल संग्रहाचे प्रकाशन शनिवारी

296

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : प्रा. जयसिंग गाडेकर यांच्या ‘स्वातंत्र्याचे गुलाम’ गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता आळेफाटा येथील सौभद्र हॉल मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. अतुल शेठ बेनके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर आणि समीक्षक व आद्य गझल संशोधक डॉ. अविनाश सांगोलेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या आनंद सोहळ्याचे आपणास आग्रहाचे अगत्याचे आमंत्रण.
सध्याच्या कोवीड-9 च्या परिस्थितीत हा कार्यक्रम सरकारने घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या अधीन राहून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ज्यांना हा कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहता येणार नाही त्यांना हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब च्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रा. जयसिंग गाडेकर यांचा’स्वातंत्र्याचे गुलाम’ हा गझल संग्रह जुन्नर तालुक्यातील हा पहिलाच गझल संग्रह असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.