रामबागवासियांनी पाण्यासाठी केले भीक मांगो आंदोलन

- पेयजलाचा पुरवठा न केल्यास दिला आंदोलनाचा इशारा

223

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : मागील एका वर्षापासून रामबाग वस्ती मधील नागरिक पेयजलाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. महिला आघाडी शहर प्रमुख मीना अडकिने यांच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी ओसीडब्लू गांधीबाग झोन महाल कार्यालय येथे गुंडी घेऊन ओसीडब्लू अधिकारी प्रकाश निर्वात यांच्या कक्षात पाणी द्या पाणी द्या … असे भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
दक्षिण पश्चिम विधान सभा मधील प्रभाग क्र. 17 रामबाग वस्तीमध्ये मागील एका वर्षापासून पिण्याच्या पाणी साठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या वस्तीतील पेयजलाची समस्या सोडविण्यात यावी या संदर्भात मनपा व ओसीडब्लू अधिकारी यांना वारंवार कळवूनही दुर्लक्ष करण्यात आहे. अनेकदा पेयजलासाठी निवेदने अधिकारी यांना देण्यात आले. मागील एका वर्षापासून रामबाग वस्ती मधील नागरिक पेयजलाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. महिला आघाडी शहर प्रमुख मीना अडकिने यांच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी ओसीडब्लू गांधीबाग झोन महाल कार्यालय येथे गुंडी घेऊन ओसीडब्लू अधिकारी प्रकाश निर्वात यांच्या कक्षात पाणी द्या पाणी द्या … असे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. मनपा सत्ता मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला आघाडी शहर प्रमुख मीना अडकिने यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने अधिकायांना रामबाग वस्तीत त्वरित पेयजलाचा पुरवाठा करावा अन्याथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. यावेळी भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख सचीन शर्मा, महिला आघाडी शहर प्रमुख मीना अडकीने, विभाग प्रमुख रजत चौहान, प्रभाग प्रमुख गोलू उपरे, शाखा प्रमुख राहुल दुपारे, उपशहर प्रमुख प्रीती लोखंडे, शाखा संघटक टीना पोटे, छकुली सहारे, नेहा भैसारे, पद्मा भिमकर, लक्ष्मी टेकाम, प्रतिभा अडकिने, शिला खेळकर, माधुरी गडलींग, रंजना म्हैसकर, गंगा इंगळे, अनीता मेश्राम उपस्थित होते.