
विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : दक्षिण नागपूर येथील उन्नती लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स नागपूर बेझनबाग, 14 नागपूरच्या वतीने नुकतेच अचकारपोहरे नगराचे उद्घाटन माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. मौजा बेलतरोडी व शब्तादी चौक येथे, जयंती नगरीच्या मागे निरंजन नगर ओम हार्डवेअरच्या मागे नव्याने नवीन नगराचे उद्घाटन झाले. यावेळी गौरव अचकारपोहरे यांनी खूप मेहनत घेतली. हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. त्याप्रसंगी भगवान शेंडे, वीरेंद्र बोरकर, धनराज नागदवणे, प्रदीप माटे, आयोजक प्रकाश सदाशिव अचकारपोहरे आणि सौ. वैजयंती प्रकाश अचकारपोहरे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

