श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन

226

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळा तर्फ स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी मेडीकल चौक येथील श्री संत गाडगे बाबा धर्मशाळा येथील पुतळ्याला मा. गिरीशभाऊ पांडव याच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर, विदर्भ अध्यक्ष मनिष वानखेडे, विदर्भ कार्याध्यक्ष मा देविदासजी नांदेकर (कारंजा लाड)विदर्भ महासचिव दीपकजी सौदागर, शहर अध्यक्ष अरविंद क्षीरसागर,याच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मा.गिरीशजी पांडव यांनी स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे बाबाच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले,
श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य मेडिकल कॉलेज परिसरातील बाहेरगावातील रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात आले. बंडुजी लोणारे यांनी परिसरातील कचरा वेचून स्वच्छतेचा संदेश दिला.
याच प्रमाणे शुक्रवारी तलाव गणेश पेठ येथील श्री संत गाडगे बाबा यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून भोजनदानाचा कार्यक्रम दिलीपजी शिरपुरकर, माजी नगर सेवक मनोज साबळे व राजेश वाघमारे यांच्या नेतृत्वा मध्ये पार पडला.
या प्रसंगी मनोज कापसे, नितिन रामटेककर,राजू सेलुकर,रमेश मोकलकर, योगेश शिरपुरकर, नीलेश सौदागर,विजय लोणारे, दिलीप टाकळकर,जय हिवरकर,नितिन बैसवारे, महेंद्र क्षीरसागर,खुशाल दोडके सर्वेश खंडारकर, दिनेश सेलुकर, हेमंत ताजने, प्रफुल नांदे, दिलीप तुरणकर,उमेश अनासाने, विजय खंडार, अनिकेत क्षीरसागर,प्रवीण हरणे, मनीष हरणे, वनकर साहेब, इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.