Home आध्यात्मिक मानवी आणि स्वनुभवातून डेबूचा गाडगे बाबा कसा झाला हे नव्या पिढीला सांगणे...

मानवी आणि स्वनुभवातून डेबूचा गाडगे बाबा कसा झाला हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे : चंद्रकात वानखडे

'असोशिएसन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉईज नागपूर शाखे तर्फे संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या स्मृतिदिना निमित्त कार्यक्रम संपन्न.

116 views
0

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : गाडगे महाराजांनी समाजाला खूप काही दिल पण त्या मोबदल्यात खूप कमी घेतल आहे.१९०५ साली डेबू घरातून बाहेर पडले आणि माणसांच्या जंगलात १२ वर्ष त्यांनी मानव सेवेचे तप केले. मानवी आणि स्वनुभवातून डेबूचा गाडगे महाराज कसा झाला हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे असल्याच प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक चंद्रकात वानखडे यांनी नागपूरात केले. स्थानिक रवीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या स्मृतिदिना निमित्त ‘असोशिएसन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉईज’ तर्फे स्मृतिदिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय वनसेवेतील अधिकारी विजय गोडबोले, मुख्यलेखापाल प्रदीप शेंडे, वनसंरक्षक सतीष वडसकर आणि नागपूरच्या सामाजिक वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर, उपस्थित होते.
एक वेगळेच तंत्र गाडगे महाराजांनी समाजप्रबोधनासाठी विकसित केलेले होते. तत्कालीन समाजरचना अलुतेदार बलुतेदार होती यांच्या सामाजिक भावनेची नस गाडगेमहाराजांना त्या वेळेला कळाली. हा डेबू १२ वर्ष कुठे भटकला याचा नकाशा तयार करणे गरजेचे असल्याचे चंद्रकात वानखडे यांनी सांगितले.
आपल्या जवळ गाडगेबाबा बद्दल विपुल ज्ञानसंपदा, साहित्य आहे पण डेबू बद्दल नाही. ती मिळणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.ऋणमोचन येथील पूर्णा नदीवरील केलेली डेबूची मदत यात्रेकरूना दिसली. स्वपरीक्षा करून घेण्यासाठी गाडगे महाराज दरवर्षी ऋणमोचनला जात होते याचीही माहिती त्यांनी दिली. चंद्रकांत वानखडे यांनी लहानपणी स्वत: गाडगे बाबाना प्रत्यक्ष पाहले असल्याच सांगितले. प्रदीप शेंडे व विजय गोडबोले ह्यांनी गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
एपीईआय अर्थात ‘असोशिएसन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉईज’ मार्फत ज्या विद्यार्थ्यांचे आई -वडिलांच छत्र हरवले त्यांना शिष्यवृत्ती दिले जात आहे. गाडगेबाबासारख्या महापुरुषांचा वैचारिक ठेवा भावी पीढी तसेच अधिकारीवर्गामध्ये वृद्धिगंत करण्यासाठी एपीईआय ही संघटना संपूर्ण देशात काम करत असल्याची व कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती नागपूरच्या सामाजिक वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी रवीनगर शासकीय वसाहतीमधील नागरिक व एपीईआयचे संजय दहिवले, राजन तलमले, भावना वानखडे,सुलभा गायकवाड, प्रतिमा पथाडे, ज्योती लभाने, रिमोद खरोळे, मोहन गजभिये,अरुण भगत, संतोष वानखडे, व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्पना चिंचखेडे तर आभार प्रदर्शन विलास तेलगोटे यांनी केले.