आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न निकाली निघणार : साठे

153

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कर्मचारी फेडरेशन (citu) तर्फे आज राष्ट्रीय आरोग्य अभियान-उप संचालक- महेश बोटले व प्रोग्रामिंग आॅफिसर-अनिल नक्षिणे यांना आरोग्य भवन मुंबई येथे सीटू राज्य पदाधिकारी यांचे सोबत आशा व गटप्रवर्तक किमान दीड तास विविध विषयावर चर्चा केली. सीटू तर्फे मांडलेल्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सीटू पदाधिकाºयांची जिद्द व काम करण्याची पद्धत याची तारीफ सुद्धा केली.
नोव्हेंबर पासून थकलेले वाढीव मानधन लवकर देणार. एपीएल/बीपीएल अट रद्द करून सरसकट मोबदला देणे. केंद्राच्या हिस्याचे बरोबरीचा राज्याने हिस्सा द्यावा. यावर प्रयत्न करणार. वाढीव मानधनातून आरोग्य समितीची कपात थांबवणार. आशा वर्कर कडून कामा व्यतिरिक्त इतर काम करून घेणाºयांवर कारवाई करणार. गटप्रवर्तक यांची ६२५ रु. प्रमाणे केलेली कपात रद्द करून एप्रील २०२० पासून वाटप करणार.इतर डाटा एन्ट्री कामाचा मोबदला गटप्रवर्तक यांना सुद्धा देणार. शहरी भागात डाटा आॅपरेटर व गटप्रवर्तक यांची अडचण दूर करणार. अशा विविध मुद्यावर सीटू पदाधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा झाली. सीटू आशा फेडरेशन तर्फे सलीम पटेल, राजेंद्र साठे, नेत्रदीपा पाटील, पुष्पा पाटील, प्रीती मेश्राम, अर्चना घुगरे, संध्या पाटील सोबत इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.