Home नागपूर पाणी बिलावरीलही शास्ती माफ करण्यात येणार

पाणी बिलावरीलही शास्ती माफ करण्यात येणार

महापालिकेचा निर्णय : अभय योजना कार्यान्वित

65 views
0

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : मालमत्ता करसंदभार्तील ‘अभय योजने’प्रमाणेच थकीत पाणी बिलसंदर्भातही मनपातर्फे २१ डिसेंबरपासून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पाणी बिलावरीलही शास्ती माफ करण्यात येणार आहे. महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे.
योजनेअंतर्गत २१ डिसेंबर २0२0 ते २१ जानेवारी २0२१ पर्यंत थकीत पाणी बिलधारकांनी बिल भरणा केल्यास त्यांना १00 टक्के शास्ती माफ केली जाईल. यानंतर ज्या उपभोक्त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही अशा उपभोक्त्यांना २२ जानेवारी २0२१ ते २२ फेब्रुवारी २0२१ पर्यंत या योजनेत सहभागी होता येईल. मात्र, त्यांना ७0 टक्के शास्ती माफ करण्यात येईल. ही योजना दोन महिन्यांसाठी अस्तित्वात राहील आणि २२ फेब्रुवारी २0२१ ला रात्री १२ वाजता संपुष्टात येईल.
जास्तीत जास्त नागरिकांनी आपले पाणी बिल भरून थकबाकीदारांच्या यादीतून आपले नाव कमी करावे, असे आवाहन जलप्रदाय समिती सभापती व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केले. यासंदर्भात जलप्रदाय सभापती म्हणाले, महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत हे मालमत्ता कर आणि पाणी कर हेच आहे. मात्र, कोविड-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन लागले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशा स्थितीत लोकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांसाठी मनपाही दिलासादायक पुढाकार घेत आहे.