गुन्हे शाखेच्या कार्रवाईत 48.53 लाखाचा मुद्देमाल जब्त

रेतीची अवैध वाहतूक

239

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : गुन्हे शाखा युनिट क्र. ४ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छापामार कारवाई केली. त्यात ४८ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट क्र.४ च्या पथकातील सहा. पोलिस निरीक्षक रमेश उमाठे यांना वाठोडा हद्दीत खरबी चौक येथे नॅशनल ढाब्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाडीत अवैध रेती भरून त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावर त्वरित कारवाई करीत पथकाने तत्काळ ते ठिकाण गाठले. त्या ठिकाणी ३ टिप्पर ६ चाकी ट्रक तसेच ३ महेंद्रा बोलेरो पिकअप गाड्या ज्यामध्ये रेती भरून होती, असे पोलिस पथकास दिसून आले. पोलिस पथकाने सदर गाडीचालक तसेच त्यांच्या गाडीमालकांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून एकूण ४८ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी अश्पाक शेख रा. बिडगान, वाठोडा, मो. आरीफ वल्द मो.आदील (२९) रा. ताजबाग, नजीर शेख वल्द जरदार शेख (३१) रा. खरबी, राजेश शिंगाडे (४२) रा. पारडी, निसार अनिल ठोंभरे (३0) रा. खरबी, प्रशांत सखाराम वंजारी (३८) रा. न्यू नंदनवन, अजीज खान मस्तान खान (४0) रा. खरबी, अजीज शेख मुस्तफा शेख (३९) रा. शरदानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.