Home नागपूर अनधिकृत लेआउट मधील भूखंड नियमित करावे

अनधिकृत लेआउट मधील भूखंड नियमित करावे

शेखर सावरबांधे यांनी पालकमंत्र्यांना दिले निवेदन

62 views
0

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : शासनाने जाहीर केलेल्या नागपूर शहरातील 572 व 1900 अनधिकृत लेआउट मधील भूखंडाचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया मनपाने प्रमाणिकपणे राबवावी या मागणसाठी शेखर सावरबांधे यांचे नेतृवात पालकमंत्री नितीन राउत यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने जाहीर केलेल्या नागपूर शहरातील 572 व 1900 अनधिकृत लेआउट मधील भूखंडाचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया नासुप्र तर्फे राबविण्यात येत होती. परंतु नासुप्र रद्द करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या अनधिकृत लेआउटमधील भूखंड नियमितकरणाचे उर्वरित काम नागपूर मनपाकडे सोपविण्यात आले. मनपा या संदर्भात अधिक प्रभावीपणे काम करेल असा लोकांचा समज होता,परंतु आता हा समज खोटा ठरला आहे.
मनपाने या कामासाठी आवश्यक यंत्रणा न उभारल्यामुळे लोकांना फार अडचणींना तोंड द्यावे लागते. मनपाचे अधिकारी या विषयाला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे अनेक लोकांची प्रकरणे प्रलंबित आहेत. अधिकारºयांच्या असलेल्या कमी संख्या बळामुळे मनपा या कामाला न्याय देउऊ शकत नाही असे दिसते.
मनपा ही प्लानींग अथारिटी असल्यामुळे संपूर्ण शहरातील बांधकामाचे नकाशेसुद्धा नगररचना विभागात मंजूरीसाठी येतात. त्यामुळे कामाचा अतिरिक्त बोझा मनपाचे हे विभाग करू शकत नाही. त्यामुळे अनधिकृत लेआउट मधील भूखंड नियमिती करणाचे काम नासुप्र कडे पुन्हा वळते करण्यात यावे अन्यथा नासुप्रचे 20 अभियंता अधिकारी मनपामध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्याकडून हे काम करवून घ्यावे या मागणीसाठी शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. शेखर सावरबांधे यांचे नेतृवात पालकमंत्री नितीन राउत यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात नंदू थोटे, दीपक आदमने, बालू आष्टनकर, मुन्ना रफीक, हसमुख पटेल, कुलदीप उपाध्याय, शशिकान्त ठाकरे, सलमान खान, तुषार कोल्हे, किशोर धोटे, प्रशांत वैरागड़े आदि उपस्थित होते