कुमारिकेवर बलात्कार, आरोपी 4 दिवसाच्या पोलिस कोठडीत

245

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : प्रतिनिधी : [दि. 17डिसेंबर ]कुमारिकेला फूस लावून पळवून नेले व एका ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्या-या युवकास कोंढाळी पोलिसांनी पकडून त्याच्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव 25 वर्षीय दिलीप शालिकराम वाघाडे सांगण्यात येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेशने दोडकी येथील 17 वर्षीय कुमारिकेला लग्नाचे फूस लावून पळवून नेले. 2 डिसेंबर रोजी केलेल्या तक्रारीवरून कोंढाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या कॉल डिटेल वरून पोलिसांनी आरोपीची फोन नंबर मिळवला व त्याची लोकेशन तपासली असता तो मध्यप्रदेशात असल्याचे कळाले. ग्रामीण पोलिसच्या स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने लोकेशन ट्रेस करून सोमवार 14 डिसेंबर रोजी आरोपी दिनेश वासाडेला पाढुर्णा तालुक्रूात करवाड गावातून बंदिस्त केले. मेडिकल अहवालानुसार आरोपी विरुदध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. काटोल न्यायालयात सुनावनी नंतर न्यायाधीशांनी 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एसडीपीओ (काटोल) नागेश जाधव के मार्गदर्शन में पोक्सो दलाच्या पीएसआय सोनाली जगताप तपास करीत आहेत.