Home Breaking News ‘रेल्वेत नोकरी लावून देतो!’ अशा भूलथापांना बळी पडू नका

‘रेल्वेत नोकरी लावून देतो!’ अशा भूलथापांना बळी पडू नका

201 views
0

वदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : प्रतिनिधी : [दि. 17डिसेंबर ] रेल्वेत नोकरी लावून देतो अशा भूलथापा देत बेरोजगार युवकांना आपल्या जाळयात फसवून त्यांच्याकडून लाखो रुपए उकळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. रेल्वेने बेरोजगारांनी अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
अशा प्रकारांवर रेल्वेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगीतले कि कोणाच्याही मार्फत रेल्वेत भर्ती होत नाही. या नियुक्त्या रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच आरआरबी व रेल्वे भर्ती प्रकोष्ठ आरआरसी यांच्या द्वारे संगणकीय लिखित परीक्षेच्या माध्यमातून होते. या नियुक्त्या उम्मीदवाराची योग्यता पाहूनच केल्या जातात.भर्ती प्रक्रियेसाठी आरआरबी आणि आरआरसी यांचे संकेतस्थळ तसेच वर्तमानपत्र व रोजगार समाचार मध्ये रीतसर प्रकाशित जाहिरातींना प्रमाण मानून इच्छुकांनी अर्ज करावेत. भर्ती प्रक्रियेसाठी रेल्वे बोर्डाने कोणत्याही एजेंटला भर्ती करण्याचे अधिकार दिले नाहीत. तसेच कोणत्याही शिकवणी वर्गाला किंवा संस्थेला प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केल्या जात नाही. त्यामुळे रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून कोणीही पैशाची मागणी करत असेल तर अशा व्यक्तिपासून बेरोजगारांनी सावधान राहण्याचे आवाहन रेल्वे बोर्डाने केले आहे.
वर्तमान काळात रेल्वेला या प्रकारच्या तक्रारी येत आहेत कि एजेंटामार्फत किंवा कोणत्याही व्यक्तिद्वारे रेल्वेत नोकरी लावून देतो अशा भूलथापा देउऊन लाखो रुपये बेरोजगारांकडून उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा व्यक्ति किंवा एजेंट नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी करीत असल्यास रेल्वे हेल्पलाइन नं. 182 वर संपर्क साधण्याचे आवाहनही रेल्वेने केले आहे.