Home नागपूर 24 डिसेंबरला डाक अदालतचे आयोजन

24 डिसेंबरला डाक अदालतचे आयोजन

0
24 डिसेंबरला डाक अदालतचे आयोजन

वदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : प्रतिनिधी : [दि. 17डिसेंबर ] भारतीय टपाल खाते अंतर्गत नागपुर ग्रामिण विभागातर्फे दिनांक 24.12.2020 रोजी विभागीय स्तरावर प्रवर अधिक्षक डाकघर, नागपुर ग्रामीण मंडल, तिसरा माला, नागपुर सिटी प्रधान डाकघर बिल्डिंग, इतवारी, नागपुर-440002 यांचे कार्यालयामध्ये 113 वी डाक अदालत सकाळी 11.00 वाजता आयोजित करीत आहे.
पोस्टाच्या कामासंबंधीत ज्या तक्रारीचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, काउंटर सेवा, बचत बँक व मनी आॅर्डर याबाबत नागपुर ग्रामीण डाक विभागाच्या अंतर्गत असलेल्या डाकघराद्वारे जसे नागपुर जिल्हा (नागपुर शहर व्यतिरिक्त), भंडारा व गोंदिया जिल्हयात उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीची एकच तक्रार विचारात घेतली जाईल. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रार केल्याची तारीख व ज्या अधिका?्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीचा उल्लेख असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्रीमती.डॉ.व्ही.ए.गुल्हाने,प्रवर अधिक्षक डाकघर, नागपुर ग्रामीण मंडल, तिसरा माला, नागपुर सिटी प्रधान डाकघर बिल्डिंग, इतवारी, नागपुर-440002 यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 22.12.2020 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. तक्रारीच्या वरील भागावर स्वच्छ अक्षरात ह्ल113वी डाक अदालतह्व असे लिहावे. त्यानंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.
तक्रारकर्ता स्वत:च्या इच्छेने स्वखचार्ने 113 व्या डाक अदालत मध्ये उपस्थित राहू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here