Home नागपूर गदिमाच्या स्मारकाची निर्मिती केव्हा?

गदिमाच्या स्मारकाची निर्मिती केव्हा?

165 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : प्रतिनिधी(15 डिसें.)-आधुनिक महाराष्टÑाचे वाल्मीकि या नावाने विख्यात ग.दि.माडगुलकर यांच्या 43 साव्या पुण्यातिथिनिमित्त काव्यजागर कार्यक्रमाद्वारे नागपुरकरांनी त्यांना श्रदधांजली अर्पण केली. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक निषेध करून गदिमाचे स्मारक निर्माण करण्याची मागणी करएयात आली.
प्रस्तुत पुण्यातिथि कार्यक्रम शहरातील वझलवार सभागृह येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. विशेष असे कि गदिमाचे स्मारक निर्माण करावे या मागणीसाठी सांकेतिक विरोधाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रÑात एकाच वेळी आयोजित करण्यात आला.
पुण्यतिथी-काव्याजागर कार्यक्रमात स्वाती सुंगळीकर,डॉ. विजया धोटे, योगेश वासाडे, सुनील वाडे, मुकुंद घारपुरे, मधुरा देशपांडे, श्रीकृष्ण चांडक,देवमन कामडी, राजू डहाके, संजय तिजारे इत्यादिंनी गदिमाच्या काव्यरचना सादर केल्या. श्रीकृष्ण चांडक यांनी गीतरामायणच्या काही अनुवादित हिंदी गीतं सादर केले. यापूर्वी वरीष्ठ पत्रकार अविनाश पाठक आणि श्रीकृष्ण चांडक यांनी गदिमाच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण केले. वरिष्ठ समाजसेवक गोपाल कडुकर यांनी विचार व्यक्त करून कार्यक्रमाचे समारोप केले.