Home नागपूर नारायणा ई टेक्नो स्कुलला मान्यता नसतांना 900 पालकांची केली फसवणूक

नारायणा ई टेक्नो स्कुलला मान्यता नसतांना 900 पालकांची केली फसवणूक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5942 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

110 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल : नागपूर प्रतिनिधी दिनांक 12 डिसेेबर नागपूर – नारायणा ई टेक्नो स्कुल सरजू टाउनजवळ वाठोडा वर्धमान नगर नागपूर येथे वर्ष 2019-20 या वर्षाकरीता वर्ग नर्सरी ते वर्ग सात पर्यंत जवळपास 900 विद्याथ्र्यांचे प्रवेश विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल असे सांगून घेण्यात आले. फीस जवळपास रूपये 60000 ते 90000 प्रती विद्यार्थी प्रती वर्ष घेण्यात आले. परंतू सदर शाळेला शासन मान्यता मिळाली नसतांना सुध्दा 900 पालकांना खोटे बोलून प्रवेश घेतले. त्यांच्या कडून भरमसाठ फीस वसूल केली अशी माहिती संघटेनेकडे प्रशांत रामंचंद्र चकोले, राहणार प्रगती काॅलनी दिघोरी नागपूर यांनी दिली.
वर्ष संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व शाळेतील अध्यापनाची पध्दत न आवडल्यामुळे शाळा सोडण्याचा दाखला मागितला असता त्यांना 6 महिन्यानंतर टीसी देण्यात आली. ती TC Kids Play School English Primary, Dabha, Nagpur  या शाळेची दिली त्यावर असलेला Udise नंबर हा त्या शाळेचाही नसुन अन्य शाळेचा असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पूढच्या वर्गात त्यांच्या मुलाचा प्रवेश अडचणीत आलेला आहे.  त्यांनी नारायणा स्कुलमध्ये 65000 शैक्षणिक शुल्क नियमितपणे भरलेले आहे त्यामुळे त्यांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन कारवाई करावी अशी मागणी सदर प्रशांत चकोले या पालकांनी केली.
नारायणा ई-टेक्नो स्कुलला शासनाची मान्यता नसल्याने शाळेला Udise नंबर मिळालेला नसुन विदयाथ्र्यांना सरल पोर्टलमध्ये शाळेची नोंद नसल्याने Student ID Number मिळालेला नाही अशी माहिती शिक्षण विभागातून कळलेली आहे. शिक्षण विभागाने सदर शाळेची तपासणी करून पालकांना न्याय दयावा तसेच मान्यता नसतांनाही मोठया प्रमाणात घेतलेली फीस पालकांना परत करण्याचे आदेश दयावेत तसेच अशा प्रकारच्या अनधिकृत शाळांना बंद करण्याचे आदेश पारित करावेत ही मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी केलेली आहे.