Home Breaking News आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांच्या पुण्यतिथी निमित्त नागपुरात सोमवारी काव्य जागरचे आयोजन

आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांच्या पुण्यतिथी निमित्त नागपुरात सोमवारी काव्य जागरचे आयोजन

148 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले गेलेले थोर कवी आणि साहित्यिक स्वर्गीय ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी दि. १४ डिसेंबर २०२० रोजी येत आहे. एक कवी आणि साहित्यिक म्हणून स्वर्गीय माडगूळकरांचे साहित्यविश्वातील स्थान अढळ आहे. त्यामुळे त्यांचे उचित असे स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात व्हावे अशी रसिकांची मागणी होती. मात्र, राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता देऊन आणि अर्थसंकल्पीय तरतूद करूनही या स्मारकाचे काम सुरु झाले नव्हते. गतवर्षी गदिमांची जन्मशताब्दी आटोपली तरीही याबाबत कोणतीही हालचाल नव्हती. त्यामुळे गदिमांच्या चाहत्यांनी यावर्षी त्यांच्या पुण्यतिथीला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात गदिमांच्या कवितांचे जाहीर वाचन करून शासनाचा अभिनव निषेध करण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. यासंदर्भात मराठीतील ज्येष्ठ कवी आणि गझलकार प्रदीप निफाडकर यांनी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, काल पुणे महापालिकेचे महापौरांनी पत्रपरिषद घेऊन एक महिन्याच्या आत गदिमा स्मारकाचे काम सुरु केले जाईल आणि निर्धारित वेळात ते पूर्ण केले जाईल, अशी घोषणा केली. या घोषणेचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. तरीही, नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. १४ डिसेंबर २०२० रोजी गदिमांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रभर काव्यजागर केला जाणार आहे.
नागपुरातही असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४.३० ते ६.३० या वेळात या कार्यक्रमाचे आयोजन वझलवार सभागृह हॉटेल आदित्य, धरमपेठ शाळेसमोर, उत्तर अंबाझरी मार्ग, धरमपेठ, नागपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गदिमां रचित गीत रामायणासह त्यांनी रचलेल्या इतर विविध कवितांचे गायन आणि वाचन केले जाणार आहे. या काव्यजागरात ज्यांना गदिमा रचित कवितांचे गायन किंवा वाचन करायचे असेल त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक श्री. अविनाश पाठक मो. ९०९६०५०५८१/ ९८९००१९३८३ किंवा श्री. सुनील वाडे मो. ८७८८३६५६७७ यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमाला गदिमा प्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांचे वतीने अविनाश पाठक, सुनील वाडे, विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलचे मुख्य संपादक गोपाल कडुकर, समिक्षक राजेश वैरागडे, योगेश वासाड, विजयाताई धोटे, शंकर घोरसे, प्रा़ प्रशांत राऊत,राजु डाहाके,प्रकाश कांबळे, श्रीकृष्ण चांडक,अर्चनाताई कोहळे,कलाम खान,पल्लवी कामडी,ह़भ़प़ सचिन काळे महाराज,प्रकाश गोतमारे, हिरामन लांजेवार, महेश उपदेव, मुकेश सराफ, प्रकाश गोतमारे, राजेश कुबडे, प्रीती कुर्वे, मिलींद तोतरे, विभा विंचुरकर, संजय तिजारे, प्रा. तीर्थराज कापगते, प्रा. मीनाक्षी इंगळे प्रभृतींनी केले आहे.