Home Breaking News भीम माझा (अभंग)

भीम माझा (अभंग)

0
भीम माझा (अभंग)
खरा प्रज्ञा सूर्य  । तोचि क्रांतिसूर्य ।।
दलितांचे धैर्य   ।  भीम माझा ।।
वाचनाचा भोक्ता । उत्तमची वक्ता ।।
घेई दीन मक्ता   ।  भीम माझा  ।।
अस्पृश्यता कथा । जाणुनी रे व्यथा ।।
सोडवी रे गुंथा  । भीम माझा ।।
समता बंधुता । भोक्ता विषमता ।।
संविधान दाता । भीम माझा ।।
उच नीच भेद  ।  देऊनिय छेद ।।
घाली साम्य साद । भीम माझा ।।
घटना निर्माता  ।  कर्तव्य जाणता ।।
अधिकार दाता  । भीम माझा  ।।
पेरी मानवता । अज्ञान जाळीता ।।
महान रे नेता  । भीम माझा ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here