शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द

178
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर ०३ डिसेंबर २०२० :  करा आंदोलनकारी शेतक-याला न्याय द्या– आप
आपल्या सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत आपल्या सरकार कडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी येत आहेत. यांच्या मागण्या शेतकरी हिताच्या असून आपण पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी आहेत. त्यामुळे आम आदमी आदमी पार्टी चंद्रपुर या आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे.
आपणास विनंती आहेकी शेतकरी संगटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेवून सकारत्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत आणि विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केसेस लावण्यात आल्यात त्या मागे घ्याव्यात या अगोदर आम आदमी पार्टी ने सप्टेंबर महिन्यात आंदोलनाद्वारे काळा कायदा मागे घ्या ही मागणी केली होती. परंतु सरकारने मागणी मान्य केली नाही त्यामुळे संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे करिता आंदोलनकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून मागण्या 3 दिवसात मान्य कराव्या अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर चे कार्यकर्ते सुद्धा ेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीला कूच करतील  असा इशारा आम आदमी पार्टी तर्फे देण्यात येत आहे.
आजचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी श्री.सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, श्री.प्रशांत येरणे संघटनमंञी,  श्री.भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष , श्री. संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, जिल्हा सोशल मीडिया हेड  श्री. राजेश चेडगुलवार, शहर सचिव श्री राजू कुडे, शहर सहसचिव श्री अजय डुकरे, शहर कोषाध्यक्ष श्री सिकंदर सगोरे, बलारपूर शहर अध्यक्ष श्री  बलराम केसकर, श्री मयूर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष, अंकुश राजूरकर, प्रफुल नैताम, सुरेंद्र फडके तथा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.