प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना जागतिक संविधान व संसदीय संघाचा “वर्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार  2020” प्रदान

223
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बेलापूर :  (बेलापूर) येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच जागतिक संविधान व संसदीय संघाचा (WCPA) चा “वर्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2020” श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, तहसिलदार प्रशांत पाटील,प्रकाश कूलथे समन्वयक दत्ता इघावे यांच्या शुभहस्ते प्रदान झाला.संशोधन, साहित्य, शिक्षण, सामाजिक, प्रशासकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.तसेच “वर्ड पार्लमेंट कोरोना वाँरियर्स पुरस्कार” मिळाला आहे.डॉ. कोकाटे यांची सात पुस्तके प्रसिद्ध असून त्या उत्तम कवयित्री आहेत..सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या आहेत तसेच एम.फील.व पीएच.डीच्या त्या संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करतात.त्याच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांनी संशोधन पदवी संपादन केली आहे.नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना प्रभारी प्राचार्य पदासाठी मान्यता दिली आहे. त्यांचेशैक्षणिक, संशोधन,प्रशासकीय, वारकरी संप्रदाय,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असे आहे.महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत डॉ. कोकाटे हिरीरीने सहभाग घेतात..त्या महाराष्ट्र साहित्य परिषद श्रीरामपूर शाखा तसेच शब्दगंध परिषद श्रीरामपूर शाखेच्या उपाध्यक्ष आहेत.त्यांना राज्यस्तरावर 14 पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे  अध्यक्षपद भुषविले आहे..शब्दगंध परिषद अहमदनगरच्या काव्य संमेलनाचे तसेच शिवांजली साहित्य काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.डॉ. कोकाटे यांना या कार्यक्रमात वर्ड कन्सिट्यूशन अँण्ड पार्लमेंट असोशिएशनची मेंबरशिप दिली गेली आहे.त्यांनी श्रीथिएटर्स अँण्ड हेल्पिंग हँन्डस संस्था निर्मित ” कागूद ” लघूपटात आईची भूमिका साकार केली आहे.अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर त्यांचे अनेकदा काव्यवाचन व्याख्यान व मुलाखतीच्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले आहे.गेल्या दिड वर्षांपासून त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून  नियमानुसार  प्रशासकीय कामे करुन आपला नावलौकिक मिळविला आहे.या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा,उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अँड.शरद सोमाणी,सहसचिव दिपक सिकची, बापूसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,भरत साळुंके,रविंद्र खटोड,राजेंद्र सिकची, सुविद्या सोमाणी, अँड.विजय साळुंके, प्रा.हंबीरराव नाईक,संचालक नंदूशेठ खटोड,शेखर डावरे श्रीवल्लभ राठी,हरिश्चंद्रपाटील महाडिक,सुरेश मुथा,प्रेमा मुथा,मधुकर दराडे,अशोक भगत,नारायणदास सिकची, शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे, बेलापूर पत्रकार संघाचे ज्ञानेश्वर गवले, नवनाथ कुताळ व पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी, पालकांनी अभिनंदन केले आहे.