कर्करूग्णाच्या अनाथ मुलाला पंचवीस हजाराचा धनादेष प्रदान

237
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :  महिला रूग्णाच्या अनाथ मुलाला संजीवनी आयुर्वेदिक कॅन्सर हाॅस्पिटल व रिसर्च इंस्टिट्याूटचे संचालक व आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ.एस.बी. मेश्राम यांनी पंचवीस हजार रूपयांचा धनादेष प्रदान केला.
यवतमाळ जिल्ह्यतील वणी येथील सविता रवींद्र पानघाटे (30), बा ओव्हरी कॅन्सर बुईब लिव्हर मेटॅस्टॅसिस व तीव आसायटीसने आजारी होत्या. त्यांनी डाॅ. एस.बी. मेश्राम यांच्याकडे 3 महिने उपचार घेतले. पुढे त्यांच्या नातेवाईकांनी सूचवल्यानुसार त्यांनी आपला उपचार एच.सी.जी. हाॅस्पिटल नागपूर येथे केला. टॅपिंग व किमोवेरेपी घेतल्यानंतर अवध्या दोन महिन्यात रूग्णाचा मृत्यू झाला. त्यांना प्रथमेष नावाचा 12 वर्शाचा मुलगा असून त्याच्या वडिलाचे दोन वर्शापूवींच निधन झाले.
अता आईचेही निघन झाल्याने तो अनाथ झाला आहे. तसेच आईच्या उपचारासाठी घेतलेली उधार रक्कम कषी परत करायची, याच्या विचारात तो होता. ही गंभीर बाब लक्षात घेता डाॅ. एस.बी. मेश्राम यांनी प्रथमेषला पंचवीस हजार रूपयांचा धनादेष प्रदान केला.