शासकीय पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पुरस्काराने दिलासा – मा. श्री. शिवाजीराव ढवळे

170
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, श्रीरामपूर :  समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करूनही शासकीय पुरस्कार प्राप्त न झालेल्या वंचितांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड  मिळाल्याने त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) चे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव ढवळे यांनी केले.  वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२० ” च्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका साध्या समारंभात कोरोना व्हायरसच्या सावटाखाली शासनाच्या सर्व नियमांचे यथायोग्य पालन करत श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यीक खंडू माळवे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कु. मृणाल देसाई हिच्या सुंदर स्वागतगिताने सुरू झालेल्या या समारंभाप्रसंगी  वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) चे महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तर प्रा.डॉ. दादाराव म्हस्के यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमात अनिल साळवे सर अध्यक्ष असलेल्या ‘ मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर ‘ यांना सामाजिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला, क्रिडा व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले. तर व्यक्तीगत पुरस्कारात बाबाजी धोत्रे (शिक्षण व साहित्य ), श्रीमती मंदा पडवेकर (सामाजिक व साहित्य), सौ. प्रिती रामटेके (सामाजिक), प्रा.सुनिल जाधव (शिक्षण व साहित्य), इनामदार शमसुद्दीन (क्रिडा व शिक्षण ), प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे (साहित्य, प्रशासन शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक), डॉ. इनामदार मोहम्मद जुनेद शमसुद्दीन ( आरोग्य व सामाजिक), गणेश लहू पवार (पत्रकारिता व सामाजिक), सौ.नंदा वसंतराव अल्लूरवार (सामाजिक), अरूण पांडूरंग संवग (शिक्षण व सामाजिक), सौ. विशाखा अरूण सवंग (शिक्षण व सामाजिक), सुरेश पांडूरंग सुतार (मॅजिक आर्ट व सामाजिक), डॉ. चंदनमलजी बाफना (सामाजिक), दादा शंकर वाघमारे (शिक्षण व सामाजिक ), दिब्यज्योती सैकीया ( सामाजिक ), प्रसन्न प्रकाश धुमाळ ( आरोग्य व सामाजिक ), कृष्णा सारडा (कला व सांस्कृतिक), अर्जुन बी आदिक (सामाजिक), राजेंद्र देसाई (नागरी सुरक्षा व पत्रकारीता), डॉ. महेशकुमार मोटे ( शिक्षण -संशोधन ), डॉ. दिलीप भुजबळ पाटील विद्यमान पोलिस अधिक्षक यवतमाळ (सामाजिक व नागरी सुरक्षा कार्य) यांना सदर पुरस्कार प्राप्त झाला.
जगातील सर्वात मोठा मॅजिक स्क्वेअर ( ४०९६ X ४०९६ X ४०९६ ) बनवून विश्वविक्रम केल्याबद्दल कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील सुरेश पांडूरंग सुतार व त्यांच्या दहा सदस्यीय चमूला सन्मानीत करण्यात आले.
या समारंभात सौ. जोत्सना थोरात यांना डब्ल्यूसीपीएचे सदस्यत्व देण्यात आले. तर रमेश जेठे ( संपादक -शिर्डी एक्सप्रेस ), प्रकाश ढोकणे (नगरसेवक), इम्रान पटेल ( संपादक -दै. धुमाकुळ), भास्करदादा लगड ( जेष्ठ साहित्यीक ), मुकंद तांबे, रज्जाक शेख ( कवी ), विठ्ठल गोराणे ( पत्रकार ) आदिनाथ जोशी ( सुत्रसंचलन – निवेदक ) नितिन राऊत (सामाजिक) यांना गौरविण्यात आले.