देशात कोरोनाबाबत केंद्र सरकार गंभीर, 4 डिसेंबरला बोलावली सर्व पक्षांची बैठक

180

विदर्भ वनत न्यूज पोर्टल, मुंबई :  कोरोना व्हायरसमुळे काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारे याबाबत खबरदारी घेत आहेत. हे पाहता, केंद्र सरकार पुढील महिन्यात सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व सदस्यांसोबत 4 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या काळात कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली जाईल.

देशात आणि जगात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. रविवारी कोरोनाचे 41,810 रुग्ण वाढले होते. सोमवारी 38,772 नवीन रुग्ण वाढले. तर 443 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या 94 लाखांवर गेली आ हे. जगात कोरोना संक्रमणाची संख्या 6,30,72,475 वर गेली आहे. जगात आतापर्यंत 14,65,181 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4,35,45,829 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.