Home Breaking News या बॅकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी ! 1 डिसेंबरपासून बदलत आहे मधून पैसे काढण्याचा नियम

या बॅकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी ! 1 डिसेंबरपासून बदलत आहे मधून पैसे काढण्याचा नियम

0
या बॅकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी ! 1 डिसेंबरपासून बदलत आहे मधून पैसे काढण्याचा नियम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नवी दिल्ली 30 नोव्हेंबर :  देशातील दुसरी मोठी सरकारी बॅक असणा-या पंजाब नॅशनल बॅकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. या बॅकेच्या एटीएमच्या नियमात काही महत्वाचे बदल होत आहेत.

देशातील दुसरी मोठी सरकारी बॅक असणा-या पंजाब नॅशनल बॅक (PNB) 1 डिसेंबर पासून एटीमए मधून पेसे काढण्याच्या नियमात काही बदल करत आहे. PNB ग्राहकांना चांगली बॅक फॅसिलिटी देण्यासाठी आणि फ्राॅड एटीएम ट्रांझाक्शन पासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बॅक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश विड्राॅल प्रणाली सुरू करणार आहे. 1 डिसेंबरपासून ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकरता तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागेल. हा नियम 10 हजारांहून जास्त रक्कम काढण्यासाठी लागू होणार आहे. बूकेने याबाबत माहिती दिली आहे.

PNB ने एक ट्वीट केले आहे, त्यानुसार – 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत PNB 2.0 ATM मधून एकाच वेळी 10000 रूपयापेक्षा जास्त रक्कम काढण्याची प्रक्रिया ओटीपी बेस्ड असेल. अर्थात नाइट आवर्समध्ये 10000 रूपयापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर PNB ग्राहकाना OTP आवश्यक असेल. त्यामुळे या वेळेत ATM मध्ये जाताना तुमचा मोबाइल बरोबर घेऊनच जा.

वाचा काय आहे PNB 2.0 ?
पंजाब नॅशनल बॅकेमध्ये युनायटेड बॅक आॅफ इंडिया आणि ओरिएंटल बॅक आॅफ काॅमर्सचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे. यानंतर जी एंटिटी अस्तित्वात आली आहे. तिला PNB 2.0 असे नाव देण्यात आले आहे. बॅकेने ट्वीट केलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट केले आहे की ओटीपी बेस्ड कॅश विड्राॅल PNB 2.0 ATM मध्येच लागू होईल. अर्थात ही सुविधा तुमच्या PNB डेबिट/ATM कार्डमधून अन्य कोणत्याही बॅकेच्या मधून पैसे काढल्यास लागू होणार नाही.

कशी काम करेल ही प्रणाली ?
– PNB एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बॅक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल.
– हा OTP केवळ एकाच Transaction साठी लागू होईल.
– या नवीन प्रणालीमधून पेसे काढण्यामुळे सध्याच्या कोणत्याही प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.
– बॅकेचे असे महणणे आहे की, यामुळे बनावट कार्डमुळे होणारे अवैध व्यवहार रोखले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here