Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

103 views
0
New Delhi: Prime Minister Narendra Modi (R) shakes hands with Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa prior to a meeting at Hyderabad House, in New Delhi, Saturday, Feb. 8, 2020. (PTI Photo/Subhav Shukla) (PTI2_8_2020_000091A)

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : तसे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहितअसेल कि त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांनाउत्तर देण्याचे विसरत नाहीत. असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजयजितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे.

खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवूनपाठवले होते. या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक  चित्रकला एक अशी शैली आहेजी स्वप्नाळू विचारांना साकार करते. या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भुत आहे. ’

त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे,  ‘तुझ्या कलाकृतीबरोबरच,पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते. पंतप्रधानांनी अजयलासल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात  जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. त्यांनी पत्रातलिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्यामुद्दयांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’  पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडते.अजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपलेविचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायचीइच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते.