विदर्भ वतन न्यूज पोर्टल, पुणे प्रतिनिधी : पुण्यातील सिरम इनस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि लशीबाबत आढावा घेतील.
पंतप्रधान पुणे दौरा (सुधारीत वेळापत्रक)
दु. 3:50 वा. पुणे विमानतळावर आगमन
दु. 3:55 वा. हेलिकॉप्टरने सिरम इनस्टिट्यूट(मांजरी)कडे रवाना
दु. 4:15 वा. मांजरी हेलिपँडवर उतरणार, सिरम इनस्टिट्यूटकडे रवाना
दु. 4:25 वा. सिरम इनस्टिट्यूटमध्ये आगमन
दु. 4:25 ते संध्या. 5:25 वाजेपर्यंत सिरम इनस्टिट्यूटची पाहणी
संध्या. 5:30 वा. पुणे विमानतळाकडे रवाना
संध्या. 5:55 वा. पंतप्रधान दिल्लीला रवाना होणार

