Home Breaking News राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

0
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, सोलापूर प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री उपचारादरमयान निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची तब्बेत अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तब्बेतीमध्ये सुधारणा न होता ती अधिक बिघडत गेली आणि अखेर त्यांची मृत्युशी सुरू असणारी झुंज थांबली. राष्ट्रवादी काॅगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी रूबी रूग्णालयाला भेट देऊन आमदार भालके यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारनंतर कोरोनामुक्त होऊन ते घरीही परतले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शुक्रवारी दुपारी 4 नंतर त्यांची तब्बेत अधिक बिघल्याने त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवल्याची माहिती रूबी रूग्णालयाचे डाॅ. ग्रांट यांनी दिली होती. दरम्यान ही माहिती राष्ट्रवादी काॅगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी रूग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृती विषयी विचारणा केली होती.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारनंतर कोरोनामुक्त होऊन ते घरीही परतले होते. मात्र त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी यग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. यानंतर ग्रांट यांनी दिली होती. दरमयान ही माहिती राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी रूग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृती विषयी विचारणा केली होती.

शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार भालके यांची तब्बेत चिंताजनक असल्याचे समजताज त्यांच्या कार्यकत्र्यांच्या गाड्या रूबी रूग्णालाच्या परिसरात जमू लागल्या होत्या. सर्वच कार्यकत्र्यांच्या चेह-यावर आपल्या नेत्याच्या तब्बेती विषयची चिंता स्पष्ट दिसू लागली होती. कार्यकत्र्यांचा जमाव रूग्णालय परिसरात वाढू लागल्यावर रूग्णालयाच्या डाॅक्टरांनी बाहेर येत भालके यांच्या तब्बेतेची व डाॅक्टर करत असेलेल्या प्रयत्नांची माहिती कार्यकत्र्यांना दिली. त्यानंतर सर्वच कार्यकर्ते आपला नेता लवकरात लवकर बरा व्हावा हिच प्रार्थना करत होते. परंतु काळाला हे मान्य नव्हते, अखेर मध्यरात्री आमदार भारत भालके याची प्राणज्योत मालवल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. या वृत्तानंतर त्यांच्या कार्यकत्र्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. भालके यांच्या मतदारसंघात ही माहिती समजताच पंढरपूर, मंगळवेढासह आसपासचा परिसर दुःखाच्या सागरात बुडाला.

आमदार भारत भालके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here