विश्वासार्हतेची वर्षपूर्ती, सरकार मजबूत

213

विदर्भ वतन न्यूज पोर्टल : शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना प्रशासकीय अनुभव नसल्याने राज्याचा गाडा हाकणे जमणार नाही असा कांगावा विरोधकांनी केला. पण विधानसभेतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण, कोरोना काळात त्यांनी घेतलेले निर्णय, कोकणातील निसर्ग चक्रीवादळ याविषयी त्यांनी आखलेली व्यूहरचना भल्याभल्यांना अचंबित करून गेली. पुरोगामी महाराष्ट्रात जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी आज महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे.