बेलापुरातील होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्या विरुद्ध आंदोलनाचा इशारा.

250
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बेलापूर प्रतिनिधी :  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु|| गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा नागरिकांना होत असल्याचे सांगत, त्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच भागवत प्रतिष्ठान बेलापूर, चे अध्यक्ष श्री अभिषेक खंडागळे यांनी दिला आहे. त्या संदर्भातील निवेदन त्यांनी आज मा. ग्रामविकास अधिकारी बेलापूर यांना दिले.
सध्या मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग सुरु आहेत, आणि अशात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत राहिल्यास नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची प्रत मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, मा. तहसीलदार श्रीरामपूर, मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर, तसेच पो. नि. श्रीरामपूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.