
पाकिस्ताननं आज देखील सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. जवान-नायक प्रेम बहादुर खत्री आणि सुखबीर सिंह अशी या जवानांची नावं आहेत.
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, राजौरी, 27 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान सुरक्षा दलातील दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करेपर्यंत वीरमरण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. घुसखोरीचा प्रयत्न असो किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्ताननं आज देखील सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. जवान-नायक प्रेम बहादुर खत्री आणि सुखबीर सिंह अशी या जवानांची नावं आहेत.

