मास्क वापरा अन्यथा हजार रूपये दंड करू !

251

नागपूर शहरातील मास्क न वापरणा-यांना एक हजार रूपये दंड केला जाईल. असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे.

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाशी लढा देताना हलगर्जीपणा नको, नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोविड संदभार्तील दिशानिदेर्शांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा नागपूर शहरातील मास्क न वापरणा-यांना एक हजार रूपये दंड केला जाईल. असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दिल्ली शहरात मास्क न वापरणा-यांना दोन हजार रूपये दंड केला आहे. औरंगाबाद शहरात मास्क न वापरणा-या व्यापा-यांची दुकाने बंद ठेवली जात आहे. नागपूर जिल्हाच्या ग्रामीण भागात हे मास्क वापरणा-यांना एक हजार रूपये दंड करण्यात आला आहे. शहरातील अनेक दुकानदार व बेजबाबदार नागरिक मासक न वापरता फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आकारण्यात येणा-या दंडाच्या रकमेत वाढ करणार का, असा प्रश्न मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना केला असता ते म्हणाले, मास्क न वापरणा-या नागरिकांकडून आतापर्यंत 91 लाख रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. असतानाही नागरिकांच्या वर्तनात बदल न झाल्यास नागपूर शहरातही दंडाची रक्कम एक हजार रूपये केली जाईल. असे संकेत त्यांनी दिले.

21479 लोकाकडून 91 लाख वसूल
सुरूवातीला नागपूर शहरातील मास्क व वापरणा-यांना 200 रूपये दंड केला जात होता 15 सप्टेंबरपर्यंत मास्क न वापरणा-या 5470 लोकांकडून 10 लाख 94 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर 26 नोव्हेंबर पर्यंत 500 रूपये प्रमाणे 16 हजार 9 लोकांकडून 80 लाख 4 हजार 500 रूपये दंड वसूल करण्यात आला अशाप्रकारे 21 हजार 479 लोकांकडून 90 लाख 98 हजार 500 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.