नागपूरात मेहुण्याने केली जावयाची हत्या.

332

घरगुती वादातून मेहण्याने त्याच्या जावयाला लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरूवारी रात्री 10.30 च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :  घरगुती वादातून मेहण्याने त्याच्या जावयाला लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरूवारी रात्री 10.30 च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल धरमदास सहारे (वय 58) असे मृतकाचे नाव आहे. ते कुंभारपु-यातील बारसे नगरात राहत होते. त्यांचा मेहुणा आरोपी विकास गुणवंत साखरे (वय 32) यांच्यासोबत गुरूवारी रात्री अतुल यांचा वाद सुरू झाला. दोघे एममेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. पाहता पाहता ते हाणामारीवर आले. आरोपी विकास साखरेने अतुल सहारे यांना खाली पडले आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर, छातीवर लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजेश अतुल सहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकास साखरे विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.