गझल

220
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :
स्वार्थासाठी जमवत गेलो
पैसा पैसा कमवत गेलो
स्वार्थासाठी जमवत गेलो
लोभी झालो साठा केला
नाती सारी गमवत गेलो
धोका देणे नीती झाली
कपटालाही रमवत गेलो
भडके ज्वाला श्रीमंतीची
थोडी थोडी शमवत गेलो
पैसेवाला झालो आता
माजोऱ्याला नमवत गेलो