गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

242
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, अहमदनगर प्रतिनिधी :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या घेण्यात आलेल्या बी.एड. परीक्षेचा निकाल विद्यापीठाने नुकताच जाहीर केला असून या परीक्षेमध्ये गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय, देवळाली प्रवराचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाविद्यालयातील बावके स्वाती सदाशिव या विद्यार्थीनीने शेकडा ७९.८५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, घोगळ सोनाली रघुनाथ या विद्यार्थीनीने शेकडा ७७.४५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय तर अंत्रे स्मिता बाळासाहेब या विद्यार्थीनीने ७६.५५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाचे श्रेय गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची  गुणवत्तापूर्ण  शिक्षणपध्द्ती, व विद्यार्थ्यांचे कष्ट यांना आहे. संस्थेच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गिता राऊत यांचा सातत्यपुर्ण गुणवत्ता विकासावरील मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या या यशाबद्द्ल महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य डॉ. गिता राऊत यांचे संस्थेचे सचिव प्रा. सतिश राऊत, मा. संचालक मच्छिंद्र पा. तांबे, नानासाहेब कदम, पत्रकार रफिक शेख यांनी अभिनंदन केले आहे .