लज्जास्पद! ६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर केला बलात्कार

193

फुल विक्रेत्या महिलेमुळे सापडली मुलगी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बंगळुरू प्रतिनिधी :  ६२ वर्षीय पुजाऱ्यानं एका १० वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं मुलीच्या घरातच हे कृत्य केलं. २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली परिसरात ही घटना घडली.

वेंकटरामणप्पा असं ६२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. मंदिरात पुजाऱ्याचं काम करतो. आरोपी आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली परिसरात मुलगी राहते. वेंकटरामणप्पा याचा जावई चौडेश्वरी मंदिरात पुजारी आहे. जावई शहराबाहेर गेलेला असल्यानं वेंकटरामणप्पा मंदिरातील नित्य पूजा करण्याच्या मदतीसाठी मुलीकडे आला होता.

२४ नोव्हेंबर रोजी दुपारी वेंकटरामणप्पा हे घरात होते. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरोपीला घराच्या परिसरात खेळणारी मुलगी दिसली. आरोपीनं मुलीला आवाज देऊन बोलावून घेतलं. तिला गोड खाऊ देण्याचं आमिष देत अत्याचार केला.

दरम्यान, मुलगी घरी आली नाही, म्हणून तिच्या घरचे काळजीत पडले. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेणं सुरू केलं. यावेळी मंदिराबाहेर फुल विकणाऱ्या महिलेनं मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं की, तिने मुलीला पुजाऱ्याच्या घरात जाताना पाहिलं होतं.

त्यानंतर मुलीचे कुटुंबीय पुजाऱ्याच्या घरी गेला. त्यावेळी त्यांना मुलगी रडत असल्याचं दिसलं. मुलीनं घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. यावेळी लोकांनी पुजाऱ्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीला तिच्या कुटुंबीयांसोबत वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, फुल विक्रेत्या महिलेची साक्षीवरून पोलिसांनी वेंकटरामणप्पा याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त सी.के. बाबा यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.