Home Breaking News महाकवी गदिमांच्या स्मारकासाठी 14 डिसेंबर रोजी जन आंदोलन

महाकवी गदिमांच्या स्मारकासाठी 14 डिसेंबर रोजी जन आंदोलन

80 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, 24 आॅक्टोबर अकोला प्रतिनिधी : महाकवी ग.दि. माडगूळाकर यांच्या निधनाला येत्या 14 डिसेंबरला 43 वर्षे पूर्ण होत आहेत. गदिमांची जन्मशताब्दीही नुकतीच झाली. तरीही या महाकवीचे स्मारक पुण्यात होत नाही ही दुदैवी बाब आहे. कोणतेही सरकार असो कोणताही पक्ष असो त्यांना या प्रश्नाची जाण नाही हेच आता म्हणावे लागेल. या सा-याचा निषेध म्हणून राज्यातील बहुतांश कलावंत (कलावंत म्हणजे साहित्यिक, गायक, संगीतकार, चित्रकार, नर्तक, शिल्पकार आणि रसिकही) यांनी राज्यभर एक अभिनव जनआंदोलन उभारायचे ठरविले आहे. 14 डिसेंबर ला मुख्य आंदोलन पुणे येथे अलका चित्रपटगृहाच्या चैाकात गदिमांच्या कविता वाचत, गात दिवसभर होणार आहे.

यात प्रदीप निफाडकर, रवी परांजपे, लक्ष्मीकांत देशमुख, पंडित विद्यासागर, आनंद माडगूळकर, शीतल श्री. माडगूळकर, डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, डाॅ. सदानंद मोरे, प्राचार्य डाॅ. शिवाजीराव मोहिते, डाॅ. सौ. सुलभाताई शिवाजीराव मोहिते, प्रा. बाळकृष्ण कवठेकर, भारत सासणे, स्पृहा जोशी, डाॅ. माधवी वैद्य, डाॅ. विश्वनाथ शिंदे प्राचार्य पद्माकर पुंडे, सुमित्र माडगूळकर, मा. सूर्यकांत पाठक, रवीमुकुल, मंजिरी आलेगावकर, मंदा खांडगे, एड.असीम सरोदे, अनिस चिश्ती, प्रा. नंदकुमार काकिर्डे, मंजूश्री ओक, सतीश पाकणीकर, अविनाश वैजापूरकर, अन्वर राजन, सुरेशचंद्र सुरतवाला जनशाहीर दादा पासलकर, अनिल दैठणकर, नित्यानंद मेहंदळे, आबा शिंदे, मनोहर सोनवणे, अविनाश सांगोलेकर, मंगेश कश्यप, शैला लिमये, किशोर सरपोतदार, धनंजय तडवळकर, लीनता माडगूळकर या मान्यवरांचा सहभाग असणार आहे. नियोजनापुरता पुढाकार प्रदीप निफाडकर पुणे हे घेत असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रदीप निफाडकर पुणे यांना संपर्क करावा.

राज्यातील प्रत्येक जिल्हयात आंदोलन होणार असून अकोला जिल्हयातील आंदोलनाची जबाबदारी जेष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कवडे, श्याम ठक, प्रा. देव लुले, निलेश देवकर, स्वपनील इंगळे, पवन वसे, अजय इंगळे, अशोक दशमुखे, अनिकेत देशमुख, संजय नेमाडे, अशोक पळसपगार यांनी घेतली आहे. अकोला जिल्हयातील कलावंतांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी निलेश कवडे मो. 9822367706 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.