लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारे ओवैसी सारखे कट्टर नेते मुस्लिम युवतींना हिंदू युवकांशी विवाह करण्याची अनुमती देतील का ? – हिंदु जनजागृती समिती

469

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल : 

अन्य धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह करून त्यांचे ‘लव्ह जिहाद’द्वारे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचे षड्यंत्र कट्टरतावादी जिहाद्यांकडून राबवले जात आहे. या विषयी केवळ भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हे, तर केरळमधील अनेक ख्रिस्ती संघटनांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिख आणि ख्रिस्ती संघटना यांनी आवाज उठवला आहे. जागतिक स्तरावरही इंग्लंड, म्यानमार आदी देशांत मुस्लिमेतर समाजांकडून ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज उठवला जात आहे. पाकिस्तानात कशा पद्धतीने हिंदु तसेच अन्यधर्मीय अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांचा निकाह मुस्लिम वयस्क पुरुषांशी लावला जातो, इस्लामिक स्टेटमध्ये यझिदी युवतींवर कसे अत्याचार करण्यात आले, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे. रशियात तर तेथील मुस्लिम उलेमा कौन्सिलने मुस्लिम पुरुषांवर अन्यधर्मीय तरुणींशी विवाह करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळे उघड असतांना एम्आयएम्चे खासदार असद्ुद्दीन ओवैसी, तसेच काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री ‘लव्ह जिहाद’ कायद्याला विरोध करत आहेत.हीच मंडळी यापूर्वी देशहिताच्या सीएए, एन.आर.सी. सारख्या तसेच ट्रिपल तलाकवर बंदी घालून मुस्लिम महिलांना आधार देणार्‍या कायद्याच्या विरोधातही रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारी ही मंडळी प्रेमाचा समान आदर करून मुस्लिम तरुणींना हिंदू तरुणांशी विवाह करण्याची अनुमती देतील का, हे घोषित करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

        लव्ह जिहाद कायद्याच्या विरोधात राज्यघटनेतील 14 आणि 21 या कलमांचा दाखला देणार्‍या ओवैसी यांना  राज्यघटनेतील समानतेचे मूलभूत तत्त्व मान्य आहे का ? असेल, तर प्रथम मुस्लिमांसाठी असलेले बहुपत्नीत्व, मुस्लिम पर्सनल बोर्ड यांसह अन्य सर्व कायदे आणि सुविधा रहित करून समान नागरी कायद्यासाठी आग्रह धरण्याचे नैतिक धैर्य दाखवावे. तसेच दिल्लीतील राहूल राजपूत या हिंदू तरुणाने मुस्लिम तरुणीशी प्रेम केल्यावर त्याची मुस्लिम समूहाकडून निर्दयपणे हत्या का केली गेली याचे उत्तर द्यावे ? त्या वेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि नेते तोंड का उघडत नाहीत ? बॉलीवुडने चित्रपटांच्या माध्यमांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचे जे काम अनेक दशके केले. तेच आता नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून मंदिरात मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणी यांचे चुंबन दृश्य दाखवणार्‍या ‘अ सुटेबल बॉय’सारख्या वेबसिरीज करत आहेत.

      केरळमधील अनेक ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादच्या षडयंत्रात फसवून इस्लामिक स्टेटच्या पहिल्या लढाईसाठी सिरीयात पाठवल्याचे उघड झाल्यावर केरळातील ‘सायरो मलबार चर्च’सह अनेक ख्रिस्ती संघटनांनी आवाज उठवला होता. केवळ एक मुस्लिमाने अन्य धर्मीय तरुणीशी प्रेमविवाह केला म्हणून विरोध नसून एका मोठ्या षड्यंत्राच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर हिंदू तरुणींची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची  मागणी होत आहे. यासाठी आता केंद्रशासनाने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा, अशी आमची मागणी आहे.