Home Breaking News छठ पूजा शहरात उत्साहात

छठ पूजा शहरात उत्साहात

102 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, द्रौनाचार्य नगर येथे जैस्वाल परिवाराच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन छठ पूजा किंवा सूर्य यश हा भारतीय संस्कृतीचा प्राचीन हिंदू सण आहे. वर्षातून एकदा ही पूजा करण्यात येते, ही पूजा चार दिवसांकरिता असते. ज्यामध्ये भगवान देव यांना पृथ्वीवरील जीवन अबांधित ठेवण्याचे आभार मानले जातात. या पूजेचे खूप महत्व असते, पहिल्या दिवशी शुद्ध शाकाहारी जेवण्याात दुधी भोपळयाचे चरण आणि भात खायचा असतो, दुस-या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो त्यात त्यांना प्रसाद म्हणून साखरेचा रस किंवा गूळमध्ये तयार केलेला भाताचा खायचा असतो, हा उपवास सोडत असतांना कोणीही कोणाला आवाज देता नाही. तिस-या दिवशी उपवास ठेवून संध्याकाळी सूर्यास्ताची पूजा करायची असते, आणि चैथ्या दिवशी सकाळी सूर्याेदयापूर्वी घाटावर पोहचून उगवत्या सूर्यांच्या पहिल्या किरणांना प्रचार करणे आवश्यक आहे. यानंतर घाटावर छठमातेची पूजा करायची असते आणि तिला मुलांच्या संरक्षणाची मागणी करावी लागते. या पूजेत सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण होत असते, पूजेत ठेकुआ आणि चना हा मुख्य प्रसादाच्या रूपात असतो, तो प्रसाद देणा-या आणि घेणा-या दोन्ही व्यक्तिना पुण्याप्राप्त होतो असे मानले जाते, अशी ही छठपुजा देशात सर्वत्र साजरी करण्यात येते.
असाच काहीसा कार्यक्रम द्रौनाचार्य नगर, त्रिमुर्ती नगर येथे संपन्न झाला. यानिमीत्त अशोक प्रसाद, दिलीप बाबु, राधेश्याम बाहीया, विद्यासागर कार्तीक जैस्वाल, प्रदिप जैस्वाल, प्रमोद जैस्वाल, मिथीलेशजी, अखिलेशजी, ए के झा, सोनल जैस्वाल, सुनिता जैस्वाल, सुमित जैस्वाल यांच्यासह मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.