
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :
अखिल भारतीय काॅग्रेस सेवादलाची स्थापना 1923 मध्ये नागपूर येथील सेन्ट्रल जेल मध्ये डाॅ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या नेतृत्वात झाली. या सेवादलाला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आर्शिवाद होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही पहिली काॅग्रेस विचारधारेची पहिली स्वयंसेवक संघटना असुन सुद्धा तिचा उल्लेख शासकीय किंवा अशासकिय स्तरावर ईतिहासात नोंद घेण्यात आलेली नाही.
तसेच 1923 झालेल्या झेंडा सत्याग्रहात काॅग्रेस सेवादलाने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडा सत्याग्रह केला. काॅग्रेस सेवादल ही संघटना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिली स्वयंसेवक संघटना असल्याने व तिची स्थापना नागपूरात झाली असल्याने या घटनेला अनन्य साधरण महत्व आहे. तेव्हा काॅग्रेस सेवादलाच्या या कार्याचा नागपूरच्या ईतिहासात उल्लेख व्हायला पाहीजे व रवि भवन, आमदार निवास व नागपूरचे विधानभवन तसेच नागपूरचे रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ऐतिहासिक घटनेचा निर्देशित फलक सर्व ठिकाणी लावण्यात यावा.
अशी मागणी नागपूर शहर काॅंग्रेस सेवादला तर्फे महाराष्ट्र शासनाला करण्यात येत आहे.

