Home Breaking News मेट्रो स्टेशनला नगाजी महाराज…..

मेट्रो स्टेशनला नगाजी महाराज…..

216 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :-  सेंट्रल एव्हेन्यूवरील मेट्रो स्टेशनला नाभिक समाजाचे आद्य दैवत संत नगाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे. सध्या सीताबर्डी ते पारडी मार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. त्यापैकी दारोडकर चौक ते चितारओळ दरम्यान होत असलेल्या मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच संत नगाजी महाराज यांच्या इ.स. 1870 शतकातील मठ आहे. जातीपातीच्या सीमा ओलांडून लोकांना सत्याचा मार्ग दाखविणारे इ. स. 1600 शतकातील नगाजी महाराज नाभिक समाजाचे दैवत व संत श्रेष्ठींच्या माळेतील पूजनीय स्थान आहे. नागपूर येथील दारोडकर चौकातील इ.स.1870 च्या शतकातील ऐतिहासिक पौराणिक जुना मठ आहे. आज त्याठिकाणी सुंदर असे देवालय व भव्यदिव्य असे सभागृहात शासकीय योजनेबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती पुरविण्यात येते. त्यामुळे या स्टेशनला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी संतश्रेष्ठ नगाजी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक‘मात करण्यात आली आहे.
संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी तपस्या विद्या मंदिरात जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक‘माला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मधुकरराव कडू, जेष्ठ समाज नेते श्री सुरेश चौधरी आणि नगाची महाराज मठाचे ट्रस्टी सचिव रमेश चौधरी उपस्थित होते. यावेळी सुरेश चौधरी यांनी संत नगाजी महाराज जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर यांनी संत नगाजी महाराज यांचे साहित्य अभंग याबाबत विचार व्यक्त केले. यावेळी प्रकाश द्रवेकार, संतोष मैदनकर, तानाजी कडवे, आनंद आंबुलकर, विजय कडवे, रमेश उंबरकर, पुरुषोत्तम द्रव्यकार, अजय मांडवकर, अमय वाटकर आणि मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.