किन्नर समाजाला नवी दिशा मिळावी….

324
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :
सोमलवाडा वर्धा रोड येथील शँलेट्स बुटिक हॉटेल मध्ये वेणी फाउंडेशन, अन्नक्षेत्र फाउंडेशन व चांगुलपणाची चळवळ, आणि सिल्वर ऐज युथोपियन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात किन्नर समाजातील भगिनींना नवीन दिशा मिळावी,  स्वावलंबनाच्या, उद्योजकतेच्या माध्यमातून सन्मानाने जगता यावे यासाठी घर वापसीचा छोटे -खानी कार्यक्रम पार पडला.  असून समाजात सर्व घटकांचे योगदान महत्वाचे आहे. परंतु स्वतःची कोणतीही चूक नसताना समाजापासून वेगळ राहून दुर्लक्षित ठरलेल्या तृतीयपंथी यांसाठी त्यांच्या हक्क अधिकारांसाठी समस्या सोडवण्यासाठी सौ.अरुणा पुरोहित यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोरोना काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध  स्तरावर मदतकार्य केले आहेत. यांच्या सामाजीक कार्याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले. दिवाळीचे औचित्य साधून तृतीय पंथीय भगिनींसोबत दिवाळी साजरी करून प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या दुर्लक्षित काळात संयम राखून धिराने भूमिका बजावल्या बाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सोबतच त्यांना स्वावलंबी व सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी उद्योजकता विकास करण्याच्या हेतूने तृतीय पंथीयांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच त्यांना भेडसावणाऱ्या सामाजीक व्यथांना विविध स्तरावरून शासन दरबारी मांडून त्याच्या निराकरणाच्या प्रयत्नासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असे आश्वासन सौ.अरुणा पुरोहित यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अनुशंगाने सर्व उपस्थितांना इम्यूनीटी बूस्टर किट वितरीत करण्यात आली. याप्रसंगी पद्मश्री सारडा, डॉ. जयश्री बारई, यांची विशेष उपस्थिती होती. रवींद्र बोकारे, आंबीडवार, यांनी उपस्थिती दर्शवून आयोजकांना कामगिरी बाबत शुभेछ्या दिल्यात. तृतीयपंथी भगिनी पैकी किन्नर विकास बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राणी ढवळे यांनी त्यांच्या व्यथा मांडून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.अरुणा पुरोहित, सौ. सारिका पेंडसे, सौ. सुप्रिया मंगरुळकर, सौ. श्रद्धा जोशी, व आदित पुरोहित यांनी परिश्रम घेतले.