गारला येथे कौमी एकता  दिवस साजरा करण्यात आला……….

225
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : भारत सरकारचा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार चा अंतर्गत येणारी भारताची  सर्वात मोठी युवा संघटना नेहरू युवा केंद्र, नागपूर व  ग्रामपंचायत गारला यांचा संयुक्त विधमाने कामठी  तालुक्यातील गारला या गावामध्ये कौमी एकता दिवस साजरा करण्यात आला.
नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा कोर प्रथमेश खूरपडी व प्रशांत महल्ले यांचा युवा नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कौमी एकता म्हणजे विविधते मध्ये एकता, आपल्यात परस्पर मनभेद आणि मतभेद नसावेत तसेच धर्मनिरपेक्षता, अहिंसा, भाषिक सौहार्द, जातीयवाद, सांस्कृतिक ऐक्य, दुर्बल घटक, महिला आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी व राष्ट्रीय एकता बळकट करण्यासाठी कौमी एकता दिवस  साजरा करण्यात आला.
यामध्ये गारला-सावळी चे सरपंच सौ. आरती विनोद शहाणे व तसेच उपसरपंच मा.श्री राहुल बोढारे हे  कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रथमेश खुरपडी यांनी केले तर आभार प्रशांत महल्ले यांनी मानले.
कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी अक्षय चौधरी, विकी शेंडे,प्रफुल्ल चवरे,सुनील उक्कुंडे, हर्ष महल्ले, प्रज्वल ढेंगरे  अमर इंगोले व गावकरी मंडळी नी सहकार्य केले.